उमेश लांडगे सातारा
सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीत बकरी ईद हा सण शांततेत आणि भयमुक्त वातावरणात साजरा व्हावा यासाठी आज दिनांक २६/०५/२०२६ रोजी कोंडवे, शिवथर व मालगाव या गावांमध्ये भव्य रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात हा रुट मार्च निघाला. यात २ पोलीस अधिकारी, २० पोलीस अंमलदार, ३९ होमगार्ड लाठी-हेल्मेटसह आणि ४ शासकीय वाहनांचा समावेश होता.नागरिकांना सुरक्षिततेचा पूर्ण विश्वास देत सर्व धर्मसौहार्द व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, असा हा रूट मार्चचा मुख्य उद्देश होता. पोलिसांच्या या सज्जतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment