सातारा-सांगली विधान परिषदेव भाजपाचा झेंडा

सातारा-सांगली विधान परिषदेवर भाजपचा झेंडा, धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय.
महाविकास आघाडी च्या मतांची बिघाडी!
अपक्ष तर भोपळ्यावरच अडकले!

उमेश लांडगे सातारा

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांना सपशेल धूळ चारली आहे. भाजपचे उमेदवार *धैर्यशील ज्ञानदेव कदम* यांनी महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप यांना एकतर्फी पराभवाची लाजीरवाणी शाई फासत दणदणीत विजय मिळवला आहे.

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत निकालाचा फैसला झाला. धैर्यशील कदम यांना तब्बल *५९३ मते* मिळाली. विजयासाठी लागणारा ४३ मतांचा कोटा त्यांनी पहिल्याच पसंतीत सहज ओलांडला. 

दुसरीकडे MVA चे उमेदवार *अभयसिंह खाशाबा जाधव उर्फ जगताप* अवघ्या *२९२ मतांवर* अडकले. म्हणजे कदमांपेक्षा तब्बल *३०१ मतांनी* पिछाडी! 

आणि अपक्ष उमेदवार *किशोर हणमंत धुमाळ*? त्यांना एकही मत मिळाले नाही. शून्य! म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी अपक्ष उमेदवारीला पूर्ण नकार दिला. 

एकूण ८५ वैध मतांपैकी ६७% पेक्षा जास्त मते एकट्या धैर्यशील कदमांच्या नावावर. आकडेच बोलत आहेत - सांगली-सातारा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि राहणार!

निकाल लागताच मतमोजणी केंद्राबाहेर भगवा फुलला. भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, "जय श्रीराम" च्या घोषणांनी आणि गुलाल उधळून जल्लोष केला. 

 
महाविकास आघाडीची या मतदारसंघातील राजकीय जमीन पूर्णपणे खचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी MVA ला नाकारले. अपक्ष उमेदवाराला शून्य मते मिळणे म्हणजे मतदारांची त्या पर्यायालाच तिलांजली.

धैर्यशील कदमांच्या या विजयाने सांगली-सातारा पट्ट्यात भाजपचे वर्चस्व अधिक घट्ट झाले आहे. विरोधकांसाठी हा केवळ पराभव नाही, राजकीय उचल बांगडीचा आहे की काय? अशी परिस्थिती आहे.


*निकाल *
*धैर्यशील ज्ञानदेव कदम (भाजप) - ५९३ मते विजयी उमेदवार*  

*अभयसिंह जगताप (MVA) - २९२ मते*  

*किशोर धुमाळ (अपक्ष) - ० मते*  
*एकूण वैध मते: ८५ | विजयाचा फरक: ३०१ मते | कोटा: ४३*

पहिल्याच पसंतीत कोटा पार करून धैर्यशील कदमांनी सांगली-सातारा विधान परिषदेवर भगवा पुन्हा फडकवला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post