केडगाव गर्भपात प्रकरणाला नवे वळण; २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल, एकाला अटक; आधी ५ जणांवरही गुन्हे
यवत/दौंड : केडगाव येथील अवैध गर्भपात प्रकरणात यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील केडगाव येथील लवंगारे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटलच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दौंड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे2q2@£❤️`Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here.Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here.Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. स्वाती लवंगारे (रा. केडगाव) आणि उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. तुकाराम यशवंत मोटे यांनी ६ जून २०२६ रोजी स्त्रीरोगतज्ज्ञ नसतानाही गर्भपाताच्या गोळ्यांचा बेकायदा साठा करून अवैध गर्भपात केल्याचा आरोप आहे.या प्रकरणात डॉ. स्वाती लवंगारे आणि डॉ. तुकाराम मोटे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.पूर्वीची कारवाई:
या प्रकरणात यापूर्वी अण्णासाहेब गिरी, अतुल जाधव, नरेंद्र ठाकरे, डॉ. मंदार माळी आणि सुंदरम कदम या पाच जणांवरही गुन्हा दाखल झाला होता. राजकीय नेत्याच्या आशीर्वादामुळे पूर्वीच्या तक्रारी दाबल्या गेल्याचेही गंभीर आरोप करण्यात येत आहेत.पोलिसांनी बेकायदा गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताला कडक आळा घालण्यासाठी तपास वेगाने सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही.
Post a Comment