महाबळेश्वर मध्ये निसर्गाची मोठी हानी; द क्लब परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड

महाबळेश्वरमध्ये निसर्गाची मोठी हानी; ‘द क्लब’ परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड

महाबळेश्वर: पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या महाबळेश्वरमध्ये ‘द क्लब’ परिसरात विनापरवाना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि उत्खनन करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेने केलेल्या पाहणीत ही बाब स्पष्ट झाल्यानंतर पालिका कर्मचारी श्री. कल्याण बाजीराव हिवरे (५२) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.या प्रकरणी क्लबच्या अध्यक्षा श्रीमती मनीषा गोखले शाह (६५), सेक्रेटरी लेफ्टनंट कर्नल गौतम नंदी (निवृत्त, ६२) आणि द्वारकाधीश कन्स्ट्रक्शनचे सुहास पार्टे (४०, मेढा, ता. जावली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २० मे २०२५ ते ११ जून २०२६ या कालावधीत मौजे सिटी सर्व्हे नंबर ११७ व ११८ मधील क्लब हद्दीत ही बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आली. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संवर्धन अधिनियम १९७५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाबळेश्वरसारख्या इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रात झालेल्या या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. पी. सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post