*हिंदुस्तान अँटीबायोटिक्सचे 'अमॉक्सिसिलिन' इंजेक्शन निकृष्ट; ESIC मध्ये खळबळ*
हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेडचे 'अल्मॉक्स' 1.5g 'अमॉक्सिसिलिन' इंजेक्शन गुणवत्ता चाचणीत निकृष्ट ठरले आहे. लॅब रिपोर्टनुसार बॅच नंबर 0027 मधील हे औषध मानक चाचणीत नापास झाले असून ESIC रुग्णालयांमध्ये खळबळ उडाली आहे.
उप-वैद्यकीय आयुक्त संजीव कोचर यांनी तात्काळ कडक आदेश देत निकृष्ट औषधाचे पेमेंट रोखण्याचे 'ESIC' ला निर्देश दिले आहेत. GeM पोर्टलवरून पुरवठा झालेले हे इंजेक्शन अत्यंत खराब दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या प्रकरणी खर्च वसूल करून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. निकृष्ट औषधांमुळे आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण आहे.
Post a Comment