अंबडचा तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला
*अंबड:* वाळू उत्खननाच्या कोट्यवधींच्या व्यवहारात अंबडचा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले.
वाळूच्या अवैध उत्खनन प्रकरणी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार सुरू असल्याची माहिती एसीबीला मिळाली होती. सापळा रचून कारवाई करत एसीबीने तहसीलदार चव्हाण यांना लाच घेताना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. शासकीय वाहनाचा गैरवापर करत लाचखोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत असून पुढील तपास एसीबी करत आहे.
Post a Comment