कराडची वाहतूक कोंडी सुटणार... साडेतीन किलोमीटरचा भव्य उड्डाणपूल अंतिम टप्प्यात!

कराडची वाहतूक कोंडी सुटणार... साडेतीन किलोमीटरचा भव्य उड्डाणपूल अंतिम टप्प्यात

एकूण ३.४७ किलोमीटर लांबीच्या सहापदरी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून शेंद्रे ते नेर्ले या एकूण प्रकल्पाचा भाग असून, या एकूण प्रकल्पाची किंमत साधारण २२२० कोटी रुपयांचा असलेला ह्या प्रकल्पातील उड्डाणपुलाची किंमत अंदाजे 450 कोटी रुपये इतकी आहे.

हा उड्डाणपूल नागरिकांसाठी लवकर सुरू करण्यासाठी कामास गती देण्या संबंधी व सुरक्षिततेच्या सर्व बाबी तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थित अधिकार्‍यांना करण्यात आल्या.

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथराव शिंदे, सौ.सुनेत्राताई पवार, यांच्या माध्यमातून पूर्ण होत असलेल्या या प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्गावर होत असणारी विशेषतः कराड शहराच्या आसपास होणारा वाहतुकीचा ताण कमी होईल व पुणे ते बेंगलोर या महामार्गावरील वाहतूकही अधिक सुरळीत व अडथळा विरहित होईल, तसेच ही वाहतुक अपघात विरहित होईल  असा विश्वास या वेळी व्यक्त केली.

या प्रसंगी कराड दक्षिण चे आमदार श्री.अतुल भोसले, कराड उत्तर चे आमदार श्री.मनोज घोरपडे, माजी आमदार श्री.आनंदराव पाटील, श्री.सुनील काटकर, श्री काका धुमाळ, श्री.नयन निकम, श्री.चिन्मय कुलकर्णी, अॅड श्री.विनित पाटील, श्री.अभिजित गावडे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post