शाहूपुरीतील सराईत गुन्हेगार टोळीला ७ महिने सातारा जिल्ह्यातून हद्दपार
सातारा: शाहूपुरी परिसरात खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाण, विनयभंग, शिवीगाळ व बेकायदेशीर दारू विक्रीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या चार इसमांच्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यातून सात महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.या टोळीतील राज श्रीमंत वैराट वय२३वर्षे, अजय शंकर बागल वत२२वर्षे, आयुष बाबु भोसले वय१८वर्षे व शुभम भैरवनाथ मोहिते वय २०वर्षे, सर्व राहणार. माजगावकरमाळ, शाहूपुरी तालुका जिल्हा सातारा. यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली.मा. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक एस. जी. म्हेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरावे सादर करून ही कारवाई केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची अशी कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment